शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत यापुढे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आठवड्यातून गाव भेट करण्याचे निर्देश!
शिरूर 30 :(कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
ग्रामपातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत. संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे, याबाबत जनसंवादातून खात्री करावी. सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर व तालुका स्तरावर आपल्या टीम सदर दौऱ्यात सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे शासन प्रशासन व सामान्य जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडून येईल, व जनतेच्या कामाचा निपटारा तातडीने होईल. त्या अनुषंगाने गाव भेट दौऱ्याचे नियोजन करावे असे शासनाचे निर्देश जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना मिळालेले आहेत.
